चला भावनिक साक्षर होऊ यां..
दैनिक सकाळच्या "संतुलित मन " दिवाळी अंकाचे भारतभर स्वागत..!
डॉ. शैलजा पाटील (मानसतज्ञ) सह-लेखिका..
आपणाला स्वतःबरोबर अनेकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतात, पुढे जायचे असते. अपयशी ठरलो, मागे पडलो, लोकांनी नावं ठेवलं तर? असे म्हणुन आपल्यासमोर अनेक प्रश्नचिन्ह उभी राहतात. आपले मन कोणत्याही प्रकारच्या चिंतेने, भीतीने ग्रासलेले असेल तर आपण रोजचे काम, संसार,खेळ, अभ्यास, मैत्री , छंद,अशा कोणत्याही ठिकाणी एकाग्र होऊ शकत नाही. साऱ्या माणसात वावरत असूनही एकटे पडतो.. म्हणूनच
आपल्या स्वभावात नैसर्गिक असणाऱ्या भावना आपण ओळखायला शिकलो, हव्या असणाऱ्या सुखकारक-दु:खकारक भावनांचे कप्पे करायला लागलो की, आपणाला त्या ताब्यात ठेवणे सोपे जाते.आपणाला आत्ता इथं नेमकं कांय होतंय हे समजलं,आपल्या व्यक्त होणाऱ्या भावनांचे नक्की कारण समजले की, आपण रागाने फणफणणार नाही की दु:खाने कोलमडणार नाही असं सांगणारा दैनिक सकाळच्या कोल्हापूर विभागाचा 'संतुलित मन' यां महत्वपूर्ण विषयावरील दिवाळी विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे या विशेषांकामध्ये आपल्या विश्व विद्यापीठाच्या मानसोपचार विभागातील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. शैलजा पाटील यांचा "चला भावनिक साक्षर होऊया " हा लेख अनेकांच्या आयुष्याला नवं वळण देत आहे.. मनःपूर्वक अभिनंदन..!


