Post envent news: One day internationationa conf. on Biomedical research and Nutraceuticals held on 20/02/2024 at KIAS

कृष्णा विश्व विद्यापीठात जैववैद्यक व पोषकऔषधी विषयक एक दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न.

कराड : येथील कृष्णा विश्व विद्यापीठात जैववैद्यकीय व पोषकऔषधी विषयक एक दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाली. कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड सायन्सेस व मायक्रोबायोलॉजिस्टस सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये 102 हून अधिक संशोधक, शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेमध्ये नेदरलँडहून आलेले डॉ. हरी शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.एम. व्ही. घोरपडे यांनी अध्यक्ष स्थान भूषवले. डॉ.डी. के. अगरवाल संचालक. संशोधन विभाग, डॉ. युगांतरा कदम अधिष्ठाता के. आय. एम. एस., डॉ. वरद राजलू के. आय. फिजिओथेरपी, डॉ. गिरीश पठाडे अधिष्ठाता के. आय. ए.एस. तसेच कार्यशाळेतील प्रमुख वक्ते उपस्थित होते. डॉ . विनय राळे ( सल्लागार, पुणे नॉलेज क्लस्टर) हे उपस्थित राहिले होते. डॉ. गिरीश पठाडे यांनी कार्यशाळेविषयी प्रस्तावित केले व त्याविषयीची माहिती उपस्थितांना दिली. तसेच डॉ. घोरपडे व डॉ. अगरवाल यांनी कार्यशाळेला मौलिक मार्गदर्शन केले, त्याचे महत्त्व पटवून दिले व कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. ही कार्यशाळा आदरणीय डॉ . सुरेशजी भोसले, कुलपति कृष्णा विश्व विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली

कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ. शर्मा प्रमुख पाहुणे (प्राध्यापक, इरासमस विद्यापीठ नेदरलँड) यांनी जैववैद्यक विषयात ट्रान्सलेशनल रिसर्च या विषयावर सादरीकरण केले. डॉ. लिंडसे ब्राऊन (प्राध्यापक, ग्रिफिथ विद्यापीठ ऑस्ट्रेलिया) यांनी ऑस्ट्रेलिया तसेच पश्चिम घाटातील विविध पोषक औषधी विषयक संशोधनावर आणि समुद्री गवत आणि त्याचे विविध फायदे यावर आपले सादरीकरण केले. डॉ. उलरीच बर्क (शास्रज्ञ, जर्मनी) यांनी अग्निहोत्र व त्याचा पर्यावरण, शेती, जलस्त्रोत, मानवी जीवन, वन्यजीवन यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामावर संशोधन सादर केले. दुसऱ्या सत्रात कृष्णा विश्व विद्यापीठातील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. युगांतरा कदम आणि त्यांचे सहकारी प्राध्यापकांनी मान्यवरांशी संवाद साधला. यामध्ये भविष्यातील कर्करोगावरील संशोधनाची रूपरेषा यावर चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी जाधव, सौ. प्राजक्ता सरकाळे (सहाय्यक प्राध्यापिका) यांनी केले. सहाय्यक प्राध्यापिका जयश्री ननवरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

DSC_8480-3000x2000-1200x800

TOP